पुणे
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला जॅकवेल, नवीन, जुने पर्वती जलशुध्दीकरण केंद्र, लष्कर, वडगाव, वारजे, एसएनडीटी जलशुद्धीकरण केंद्र आणि भामा आसखेड प्रकल्प अंतर्गत पाणीपुरवठा होणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या कामामुळे संपूर्ण पुणे शहर आणि उपनगरांचा पाणीपुरवठा गुरुवारी पूर्ण दिवस बंद राहणार आहे.
या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (१८ ऑक्टोबरला) उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. जलशद्धीकरण केंद्रातील कामे एका दिवसातच पूर्ण करण्याचा प्रयत्न पालिकेचा असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे शहरासह उपनगरांचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद
