पुणे- शहरात झालेला पाऊस आणि खडकवासला धरणातून झालेला विसर्ग यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील सुमारे शंभरहून अधिक घरे पाण्याखाली गेली,तसेच डेक्कन,वारजे तसेच शिवणे परिसरातील काही घरांमध्येही पाणी घुसले.ही परिस्थिती उद्भवण्यामागील कारणे शोधण्यासाठी महापालिकेने आता तीन सदस्यांची समिती नेमण्याचा निर्णय घेता आहे.
या समितीत जलसंपदा खात्याचे एक अधिकारी निमंत्रित सदस्य म्हणून असणार आहे.या समितीने सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करायचा आहे.अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी ही माहिती दिली. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात २५ जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती.
त्यानंतर मध्यरात्री कोणीही पूर्वसूचना न देता ५० ते ५५ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला.या पाण्यामुळे एकतानगरी, विठ्ठलवाडी,निंबजनगर,
वारजे तसेच शिवणेच्या काही भागांत २०० हून अधिक घरे तर तब्बल १२०० नागरिक बाधित झाले. यामध्ये जलसंपदा विभागाने केवळ ३५ हजार क्युसेक पाणी सोडल्याचा दावा केला आहे.त्यामुळे इतक्या कमी पाण्यात पूर कसा आला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.