पुणे
पुणे विमानतळाला जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. देवेंद्र फडणवीस हे पुणे पालखी मार्ग भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यासंबंधी सरकारला प्रस्ताव दिला होता, तो आम्ही स्वीकारला आहे, येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळेल अशी माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.