पुणे – पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलनंतर आता जुन्या विमानतळाच्या इमारतीचा पुनर्विकास केला जाणार आहे.यासाठी विमानतळ प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.या पुनर्विकास कामासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत
जुन्या टर्मिनलचा कायापालट केल्यानंतर ही जुनी आणि नवीन इमारत जोडली जाणार आहे. त्यानंतर जुन्या टर्मिनलमधून नवीन टर्मिनलमध्ये विमान कंपन्या टप्प्याटप्प्याने हलविल्या जाणार आहेत. सध्या १२० विमानांचे उड्डाण व आगमन नवीन टर्मिनलमधून होत असून लवकरच सर्व सेवा नवीन टर्मिनलमध्ये हलविण्यात येणार आहे.त्यानंतर जुने टर्मिनल बंद करून त्याचा विकास केला जाणार आहे. जुन्या टर्मिनलच्या विकासासाठी २५ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. त्यानुसार विमानतळ प्रशासनाकडून निविदा काढल्या आहेत.जुन्या टर्मिनलचे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.