पुणे-लोणावळा सर्व लोकल फेर्‍या येत्या रविवारी रद्द

पुणे – पुणे-लोणावळा मार्गावरील कामशेत-तळेगाव दरम्यान येत्या रविवार ५ जानेवारी रोजी पुलाच्या कामानिमित्त विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटापर्यंत हा पॉवर ब्लॉक असून यादिवशी पुणे- लोणावळा सर्व लोकल फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत.

पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.तसेच सीएसएमटी मुंबई-एमजीआर चेन्नई एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक- काकीनाडा एक्स्प्रेस,ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस,एमजीआर-चेन्नई-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, तिरुवनंतपुरम- सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस, दौंड-इंदूर एक्स्प्रेस या गाड्या १५ ते ३० मिनिटांपर्यंत उशिराने धावतील.तसेच शिवाजीनगर-लोणावळा,लोणावळा-पुणे, लोणावळा-शिवाजीनगर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे यादिवशी सीएसएमटी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस सीएसएमटी मुंबईहून ८.४० ऐवजी ११.१० वाजता सुटणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top