पुणे रेल्वे स्थानकावर२ नवे प्लॅटफॉर्म होणार

पुणे – प्रवाशांची वाढती गर्दी आणि रेल्वेगाड्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे रेल्वे स्थानकावर २ नवीन प्लॅटफॉर्म तयार केले आहेत. तसेच ४ प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा तयार झाला आहे.पुढील काही दिवसांत या कामाची निविदा निघणार आहे.पुणे रेल्वे स्टेशनवरून दररोज २०० हून अधिक रेल्वेगाड्या आणि १,५०,०००हून अधिक प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांची आणि गाड्याची संख्या जास्त असल्याने स्टेशनची सध्याची क्षमता पुरेशी ठरत नाही.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्याचा निर्णय केला आहे. फलाट विस्तारीकरण आणि २ नव्या फलाटाचे आराखडे तयार करण्यात आले असून २४ डब्यांच्या गाड्यांसाठी ४ फलाटांची लांबी वाढवण्यात येणार आहे.या कामांसाठी ३०० कोटी खर्च अपेक्षित आहे.पुणे रेल्वे स्थानकावर एकूण ६ फलाट आहेत. विस्तारीकरण केल्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट संख्या ८ होईल.पुढील काही दिवसांत पुणे रेल्वे स्टेशनच्या विस्ताराच्या कामाची सुरुवात होईल. दोन नव्या प्लॅटफॉर्ममुळे पुणे रेल्वे स्टेशनवरील भार थोडासा हालका होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top