पुणे – दिवाळीनिमित्त आपापल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांमुळे पुणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली . या गर्दीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उत्तरेकडीला राज्यांसाठी सोडण्यात आलेल्या विविध गाड्यांमुळे ही गर्दी झाली.मुंबईप्रमाणेच पुण्यात उत्तर प्रदेश व बिहारमधील कामगार मोठ्या संख्येने आहेत. काही खास सणानिमित्त ते आपापल्या गावी जात असतात. सध्या दिवाळी व नंतर होणाऱ्या छटपूजेसाठी उत्तरेत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी रेल्वेतर्फे विशेष गाड्याही सोडण्यात आल्या आहेत. मात्र पुणे रेल्वेस्थानकाची रचना व प्रवाशांची वाढलेली गर्दी यामुळे सध्या तिथे मोठी गर्दी होते. उत्तरेकडे जाणाऱ्या या गर्दीचे नियोजन करण्यात पोलिसही कमी पडत आहे. मुंबईतील वांद्रे येथे घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये असा प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे रेल्वेस्थानकावर कोणती गाडी कोणत्या फलाटावर येणार याचे योग्य नियोजन नसल्यानेही इकडून तिकडे पळणाऱ्या प्रवाशांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होते असे काही प्रवाशांनी सांगितले.
पुणे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी
