पुणे – पुणे मेट्रो सेवा आता रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.काल प्रजासत्ताक दिनापासून हा मेट्रो प्रशासनाने हा बदल लागू केला. त्यामळे ही मेट्रो सेवा सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुलभ आणि जलद होण्यासाठी हा निर्णय घेण्यत आला आहे.
नवीन वेळापत्रकानुसार पीसीएमसी ते स्वारगेट सेवा पर्पल लाइन सेवा सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असणार आहे. यामध्ये सकाळी ६ ते ८, ११ ते ४, रात्री ८ ते १० या कालावधीत प्रत्येक दहा मिनिटाला मेट्रो सेवा सुरू असेल. तर रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत प्रत्येकी १५ मिनिटांनी मेट्रो असणार आहे. तसेच, सकाळी ८ ते ११, दुपारी ४ ते ८ या गर्दीच्या वेळेत प्रत्येक ७ मिनिटाला मेट्रो उपलब्ध असणार आहे. अॅक्वा लाइनवर आणि वनाझ ते रामवाडीपर्यंत हेच वेळापत्रक लागू होणार आहे.
याशिवाय पुणे मेट्रोने ५ हजार प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह पुणे ट्रांझिट कार्डदेखील सुरू केले आहे. या ट्रांझिट कार्डमुळे पुणेकरांच्या पैशात बचत होणार आहे. ११८ रुपयांना मिळणारे हे कार्ड फक्त २० रुपयांमध्ये उपलब्ध झाल्याने पुणेकरांना दिवसभरात फक्त २० रुपयांमध्ये प्रवास करता येणार आहे. तसेच, या काही मिनिटात मिळणाऱ्या या कार्डसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही.