पुणे- महात्मा फुले मंडई परिसरात काल मध्यरात्री बाराच्या सुमारास मंडई मेट्रो स्टेशन येथे आग लागली. मेट्रो स्थानकात तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून तातडीने ५ वाहने रवाना करण्यात आली. अग्निशामक दलाला पाचच मिनिटात आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. यामध्ये मेट्रो स्थानकाचे मोठे नुकसान झाले असले तरी रात्री आग लागल्याने प्रवाशांची वर्दळ नव्हती. त्यामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नाही. ही आग वेल्डिंगचे काम सुरु असताना लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या मेट्रोस्थानकाचे उद्घाटन २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले होते. मेट्रोचे काम अर्धवट असताना उद्घाटन केल्याने अशा घटना घडल्यानचे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पुणे मेट्रोच्या मंडई स्टेशनला आग
