पुणे – इंडिगो कंपनीने पुणे आणि भोपाळ मार्गावर नव्याने विमानसेवा सुरू केली आहे.यामुळे पर्यटनासह या दोन शहरांमधील महत्त्वाच्या व्यापार व्यवसायाला देखील प्रोत्साहन मिळणार आहे. येत्या २७ ऑक्टोबरपासून दररोज या मार्गावर प्रत्यक्ष उड्डाण सुरू होणार आहेइंडिगोचे प्रमुख विनय मल्होत्रा यांनी सांगितले की,दिवाळीच्या आधी म्हणजे २७ ऑक्टोबरपासून पुणे-भोपाळ ही नवी विमानसेवा सुरू होणार आहे.तसेच याच दिवसापासून पुणे- इंदूर, पुणे-चेन्नई आणि पुणे-रायपूर या मार्गांवर देखील इंडिगो आपल्या उड्डाणांची संख्या वाढवणार आहे.नवीन विमानसेवेतील६ ए-२५८ हे पुणे-भोपाळ विमान २७ ऑक्टोबरपासून दररोज दुपारी १ वाजता उड्डाण करेल आणि २ वाजून ३५ मिनिटांनी पोहचेल.६ ए-२५७ हे भोपाळ-पुणे विमान दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी उड्डाण करेल आणि ४ वाजून ५० मिनिटांनी पोहचेल.
पुणे- भोपाळ विमानसेवा२७ ऑक्टोबरपासून सुरू होणार
