मिरज – पुणे ते बिकानेर दरम्यान धावणारी साप्ताहिक एक्स्प्रेस आता मिरजेतून बिकानेरपर्यंत थेट एकाच क्रमांकाने धावणार आहे. तसेच या एक्स्प्रेसला सांगली आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे पूर्ण झाले आहे.त्यामुळे पुण्यातून धावणार्या काही एक्स्प्रेस गाड्यांचा प्रायोगिक तत्त्वावर मिरजपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.पुणे-बिकानेर एक्स्प्रेसचादेखील प्रायोगिक तत्त्वावर विस्तार करण्यात आला होता.ही एक्स्प्रेस यापूर्वी मिरज ते पुणे दरम्यान विशेष रेल्वे आणि पुण्यातून बिकानेर एक्स्प्रेस म्हणून धावत होती.आता ती थेट मिरज-बिकानेर म्हणून २०४७६ या क्रमांकाने धावणार आहे.ही एक्स्प्रेस मिरजेतून प्रत्येक मंगळवारी दुपारी २.२० वाजता मिनिटांनी सुटेल. तर सांगली स्थानकांवरून २.४० वाजता किर्लोस्करवाडी स्थानकातून ३ वाजता सुटणार आहे.