मुंबई
मुंबई उच्च न्यायालयाने पुणे येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेल्या कॅन्सरपिडीत आरोपीला जामीन मंजूर केला.
७२ वर्षीय सुर्याजी भोसलेना जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी म्हटले की, पीएमपीएलए कायद्यातील तरतुदींचे पालन करतांना आरोपीच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करता येणार नाही. ईडीला अद्याप २५० साक्षीदार तपासायचे आहेत. या संदर्भातील सुनावणी अद्याप सुरु झालेला नाही. आरोपी जाधव याने त्यांना होऊ शकणाऱ्या कमाल शिक्षेच्या कालावधीचा अर्धा वेळ कारागृहात घालवलेला आहे. ईडीने याआधीच त्यांची मालमत्ता जप्त करुन तिची विक्री करुन ६० कोटी रुपये वसूल केले आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे की जाधव हे ७२ वर्षांचे असून ते कॅन्सरपिडीत आहेत. त्यांना जामीन दिल्यावर ते पळून जाण्याची कोणतीही शक्यता नाही. असा युक्तीवाद करीत मुंबई उच्च न्यायालयाने सुर्याजी जाधव यांना ५ लाख रुपयांच्या व्यक्तीगत मुचलक्यावर जामीन मंजूर केला. सुर्याजी जाधव यांना २०२१ साली अटक करण्यात आली होती. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या कर्ज वाटपात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.