पुणे: पुण्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनाच डेंग्यू झाल्याची लक्षणे दिसत आहेत. भोसले यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचा प्राथमिक चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला.डॉ.राजेंद्र भोसले यांचे निवासस्थान मॉडेल कॉलनीत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने आयुक्तांच्या बंगल्याची पाहणी केली.डासांच्या अळ्या असलेल्या ठिकाणी पालिकेकडून औषध फवारणी करण्यात आली .पुण्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने डासांच्या आळ्या आढळतीलत्या सोसायट्या आणि विविध आस्थापनांना महापालिकाप्रशासन दंड करत आहे. आरोग्य विभागाकडून स्वच्छता बाळगण्याचे आवाहन केले जाते आहे.