अयोध्या – राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मंदिर परिसरात आणखी १८ मंदिरेही बांधली जात आहेत. २२ जानेवारी २०२५ रोजी अयोध्येमध्ये पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठापना सोहळा रंगणार आहे.अयोध्येतील राम मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. राम मंदिरातील दुसऱ्या मजल्यावर राम दरबाराची स्थापना होणार आहे. राम दरबारातील मूर्तींची निर्मिती ही पांढऱ्या संगमरवराच्या दगडामध्ये जयपूर येथे करण्यात येत आहे. राम दरबारातील मूर्तींची उंची ४.५ फूट एवढी असणार आहे. त्यामध्ये श्रीराम, सीता माता, लक्ष्मण, हनुमंत, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती असतील. या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी होणार आहे.राम मंदिर निर्मिती समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, राम दरबारातील मूर्तींच्या निर्मितीचे काम नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राम मंदिरातील राम दरबाराची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल.
पुढील वर्षी २२ जानेवारीलाराम मंदिरात पुन्हा प्राणप्रतिष्ठा मुहुर्त !
