मुंबई – कोविड-१९ महामारीमुळे गेल्या चार वर्षांपासून लांबणीवर पडलेली जनगणना पुढील वर्षीपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. २०२१ मध्ये होणारी ही जनगणना प्रक्रिया २०२५ ते २०२६ अशी वर्षभर सुरू राहणार आहे. यापुढेही जनगणनेचे चक्र बदलणार असून पुढील जनगणना दर दहा वर्षांनी २०३५. २०४५. २०५५ मध्ये होईल. तसेच जनगणना पूर्ण झाल्यानंतर लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात येईल. २०२८ पर्यंत लोकसभा मतदारसंघांची ही पुनर्रचना प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, विरोधी पक्षांच्या मागणीनुसार जातनिहाय जनगणनेबाबत सरकारचा निर्णय झालेला नाही.
पुढील वर्षी जनगणना वर्षभर प्रक्रिया होणार
