Home / News / पिंपरीत दुचाकी झाडावर आदळून २ इंजिनिअरचा मृत्यू

पिंपरीत दुचाकी झाडावर आदळून २ इंजिनिअरचा मृत्यू

पुणे- हिंजवडी येथे भरधाव दुचाकीची झाडाला धडक बसल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सौरभ यादव...

By: E-Paper Navakal

पुणे- हिंजवडी येथे भरधाव दुचाकीची झाडाला धडक बसल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सौरभ यादव (२७) आणि अनुराग पांडे (२७) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.- सौरव हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. अनुराग हैदराबाद येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. सौरभ दुचाकीवरुन अनुरागला घेऊन हिंजवडी चौकातून फेज वन सर्कलकडे जात होता. इंडियन थाळी हॉटेलसमोरील फूटपाथवर असलेल्या झाडाला सौरभच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. त्यात सौरभ आणि अनुराग पांडे या दोघांचाही मृत्यू झाला.

Web Title:
संबंधित बातम्या