मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबल्याने लोकांना त्रास सहन करावा लागला. तेव्हा आपातकालीन यंत्रणा आणि पालकमंत्री कुठे होते. अद्याप मुंबई महापालिकेतील १५ वॉर्ड ऑफिसर का नेमले नाहीत. काल रस्त्यावर महापालिकेचे अधिकारी दिसले नाहीत. रस्त्यावर पंप चालू नव्हते आणि पंपिंग स्टेशन सुरू केले नसल्याचा आरोपही ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषदेत केला.
आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, घाटकोपर मेट्रो स्थानकावर आणि रेल्वे स्थानकावर गर्दी, रस्त्यावरील वाहतूक कोंडी, असे मुंबईचे इतके भयानक चित्र मी कधीही पाहिले नव्हते. आज मुंबई, पुणे आणि ठाण्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही. काही मिनिटांच्या पावसात मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांत लोकांचे हाल झाले. २००५ नंतर पहिल्यांदाच पश्चिम द्रुतगती महामार्ग तुंबला, मुंबई महापालिकेची यंत्रणा काल कुठे होती? दोन पालकमंत्री काल कुठे होते? मी मुंबईतील रस्ते घोटाळा उघड केला. मात्र अजूनही रस्ते खोदून ठेवले आहेत. अर्धा किलोमीटरदेखील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम झालेले नाही. एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नाहीत.