पालघर- पालघर जिल्ह्यातील डहाणू व डहाणू पूर्वेच्या गंजाड, कासा, चारोटी व आसपासच्या परिसरात आज पहाटे तीव्र आणि सौम्य स्वरूपाचे दोन भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा पहिला धक्का पहाटे ६.३५ वाजताच्या सुमारास बसला त्याची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती. तर दुसरा भूकंपाचा धक्का ६.४० वाजताच्या सुमारास बसला. परंतु हा धक्का सौम्य असल्यामुळे त्याची नोंद झाली नाही. या भूकंपात कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरातील नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे.
पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के
