पालघर – पालघर जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. यात मच्छीमार, बागायतदार आणि वीट उत्पादकांचे लाखोंचे नुकसान झाले. या अचानक पडलेल्या पावसामुळे वाणगाव, वासगाव, वीरे आणि घोलवड येथील बागायतदारांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर चिकू, मिरची, लिलीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचेही नुकसान झाले.
फेब्रुवारी ते मे या कालावधीत ओले मासे सुकवले जातात. अशा काळात पाऊस पडल्याने सुकवण्यासाठी टाकलेले बोंबील, मांदेली, कोळंबी व इतर मासे पावसाने ओले झाले. त्यामुळे ते कुजल्याने मच्छीमारांचे नुकसान झाले. डहाणू खाडी, दिवादांडी, बोर्डी, येथे बोंबील उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसला. तसेच सोमवारी संध्याकाळी वादळी वारे आणि पावसाळी हवामानामुळे डहाणू खाडी आणि धाकटी डहाणूच्या मच्छीमार नौकांना मासेमारीसाठी जात आले नाही.
पालघरमध्ये अवकाळी पावसामुळे