पालघर – पालघरच्या सफाळे येथे एक्स्प्रेसच्या धडकेत आज सकाळी वैष्णवी रावल (१६) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. वैष्णवी रावल ही माकणे येथिल रहिवासी असून ती क्लास संपवून घराकडे निघाली होती. वैष्णवी कानात ईयरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत होती. रेल्वेरूळ ओलांडत असताना मुंबईहून गुजरातच्या दिशेने राजधानी एक्स्प्रेस जात होती. मात्र कानात ईयरफोन घातल्यामुळे तिला ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही. त्यामुळे हा अपघात झाला.
सफाळे स्थानकात कानात ईयरफोन घातल्याने अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. याच ठिकाणी ७ डिसेंबर रोजी नितेश चौरसिया हा तरुण कानात ईयरफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला होता. माकणे येथे जाण्यासाठी सफाळे रेल्वे स्थानक परिसरातून पूर्वेकडून पश्चिमेकडे जावे लागते. या भागात रेल्वे फाटकाजवळ पादचारी पुल नसल्याने असे अपघात होत असतात असे माकणे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. असे अपघात होऊन नेये यासाठी रेल्वे फाटकात पादचारी पुल बांधावा, अशी मागणी माणके ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.