मुंबई – पवईतील जोगेश्वरी – विक्रोळी जोड रस्त्याच्या पुलाजवळ तानसा पश्चिम जलवाहिनीत आज पहाटे पाणी गळती सुरु झाली होती. त्यामुळे या जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद केला होता. त्यानंतर या जलवाहिनीचे काम महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तत्काळ सुरु केले. मात्र, या दुरुस्तीसाठी २४ तासांचा कालावधी अपेक्षित असल्याने या कालावधीत पाणी पुरवठा बंद ठेवणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्ती काळात नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले. या दुरुस्ती कामासाठी पवई ते धारावी दरम्यान जलवाहिनी बंद केली. त्यामुळे एस विभाग, के पूर्व विभाग, जी उत्तर विभाग आणि एच पूर्व विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणी गळतीमुळे पवई परिसरात पाणी पुरवठा बंद
