बिहार- बीपीएससी परीक्षा रद्द करुन फेरपरीक्षेची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आज अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्या कार्यकर्त्यांनी पाटण्यात हिंसक आंदोलन केले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी दुकानांची आणि वाहनांची तोडफोड करत गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.
पप्पू यादव यांनी आज ‘बिहार बंद’ची हाक दिली होती. हा बंद यशस्वी करण्यासाठी पाटणा सायन्स कॉलेजमधील पप्पू यादव समर्थक प्रथम अशोक राज पथावरून पाटणा कारगिल चौकाकडे निघाले. यावेळी पप्पू यादवदेखील त्यांच्यासोबत होते. या समर्थकांनी हिंसाचार सुरू केला. काठ्या, बॅनर, पोस्टर घेऊन बंदच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी तोडफोड करुन दुकानांची शटर बळजबरीने ती बंद केली. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर लाठीमार करून काचा फोडल्या. अशोक राजपथ येथे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला आणि बॅनर, टायर जाळले. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. या बंदला भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने पाठिंबा दिला होता.
पाटण्यात पप्पू यादव यांच्या कार्यकर्त्यांचे हिंसक आंदोलन
