पाच मुलांची हत्त्या करणाऱ्या आईला १६ वर्षांनंतर इच्छामरण

ब्रुसेल्स- बेल्जियममधील महिलेने पोटच्या पाच मुलांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर १६ वर्षांनी तिला विनंतीनुसार इच्छामरण देण्यात आले. बेल्जियममधील या घटनेमुळे २००७ साली संपूर्ण देश हादरला होता. जिनेव्हिव्ह लरमिट असे या महिलेचे नाव होते.

जिनेव्हीव्ह लरमिटने २८ फेब्रुवारी २००७ रोजी स्वतःच्या ५ मुलांची हत्या केली. ही घटना बेल्जियममधील निव्हेलस शहरात घडली. स्वयंपाकघरातील चाकूच्या साहाय्याने तिने मुलांचे गेले कापले. यात एक मुलगा आणि चार मुलींचा समावेश असून सर्वजण ३ ते १४ वर्षे वयोगटातील होते. त्यांनतर तिने स्वतःवर चालूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा हा प्रयत्न अपयशी ठरला. कारण, तिने वार केल्यानंतर आपत्कालीन क्रमांकावर फोन करून मदत मागितली व स्वतःचे प्राण वाचवले. पोलिसांनी तिला अटक करून २००८ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१९ मध्ये तिला मानसिक उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणाला १६ वर्षे झाल्यानंतर आता तिला इच्छामरण देण्यात आले.

Scroll to Top