पाक-अफगाणिस्ताननंतर आता
अर्जेंटिना,चिलीत भूकंपाचे धक्के

ब्यूनस आयर्स : उत्तर भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर आता बुधवारी रात्री अर्जेंटिनामध्ये भूकंप झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, अर्जेंटिनामधील सॅन अँटोनियो डे लॉस कोब्रेसच्या वायव्येस ८४ किमी अंतरावर ६.५ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला.
प्रांतीय राजधानी सॅन साल्वाडोर डी जुजुयपासून सुमारे १४७ किलोमीटर वायव्य प्रांतातील जुजुयमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजता भूकंप झाला. उत्तर चिलीमध्येही त्याचे धक्के जाणवले.जुजुई येथील रहिवाशांना त्यांच्या मोबाईल फोनवर भूकंपाबद्दल सतर्क करण्यात आले होते. भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तर इक्विक हे उत्तर चिलीमधील अटाकामा वाळवंटाच्या पश्चिमेकडील किनारपट्टीचे शहर आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
बुधवारी चिलीच्या इक्विकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू चिलीच्या इक्विक शहरापासून ५१९ किमी आग्नेय दिशेला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) ही माहिती दिली. इक्विक हे उत्तर चिलीमधील अटाकामा वाळवंटाच्या पश्चिमेकडील किनारपट्टीचे शहर आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Scroll to Top