पाकिस्तान सरकारच्या ट्विटर
हँडलवर भारतात बंदी

सॅन फ्रान्सिस्को – ट्विटरने पाकिस्तानबाबत मोठी कारवाई केली. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली. भारत सरकारच्या कायदेशीर मागणीवरूनच ट्विटरने ही कारवाई केली. ज्यात पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात आले. त्यामुळे आता पाकिस्तान सरकारने ट्विटरवर टाकलेली कोणतीही पोस्ट भारतात दिसणार नाही. मात्र, या कारवाईबाबत अद्याप भारत सरकारच्या आयटी मंत्रालयाकडून किंवा पाकिस्तानकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

ट्विटरच्या मार्गदर्शकतत्वांनुसार, न्यायालयाचा आदेश किंवा सरकारी मागणी यांसारख्या वैध कायदेशीर मागणीवर ट्विटरला कारवाई करावी लागते. कोणत्याही देशाच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार किंवा कायदेशीर मागणीनुसार ट्विटरला सर्व प्रकारच्या खात्यांवर बंदी घालणे बंधनकारक आहे. दरम्यान, या कारवाईनंतर भारतातील नागरिक पाकिस्तानचे ट्विटर हँडल पाहू शकणार नाहीत. पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल भारतात ब्लॉक होण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधीही अनेकदा पाकिस्तानच्या अधिकृत ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

Scroll to Top