इस्लामाबाद- पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढत आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये ऐतिहासिक वाढ केली आहे.देशात पेट्रोलच्या दरांमध्ये तब्बल २६ रुपयांची तर डिझेलच्या दरात १७ रूपयांची वाढ केली आहे.त्यामुळे आता पाकिस्तानात पहिल्यांदाच पेट्रोल प्रतिलिटर ३३१ रुपये तर डिझेल प्रति लिटर ३२९ रुपये झाले आहे.काल शनिवारपासून ही दरवाढ केली आहे.
सरकारच्या या इंधन दरवाढीमुळे पाकिस्तानच्या जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.सरकारने केलेल्या घोषणेनुसार, पेट्रोलची किंमत २६ रुपये २ पैशांनी वाढली आहे.त्यामुळे पेट्रोलची किंमत आता ३३१ रुपये ३८ पैसे इतकी झाली आहे. हाय स्पिड डिझेलच्या किंमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या किंमतीमध्ये १७ रुपये ३४ पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे डिझेल आता ३२९ रुपये १८ पैशांना मिळत आहे.डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानातील चलनाची किंमत खूप घसरली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्याने त्याचा परिणाम पाकिस्तानच्या पेट्रोलियम उत्पादनावर होत आहे. याआधी सरकारने दोन वेळा किंमतीमध्ये वाढ केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी केलेल्या घोषणेत काळजीवाहू सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये तब्बल ३५ रुपयांनी वाढ निर्णय करण्याचा निर्णय घेतला होता.
पाकिस्तानात पहिल्यांदाच पेट्रोल ३३१ रुपये लिटर!
