अमृतसर- पाकिस्तानने 200 पैक्षा अधिक भारतीय मच्छीमारांना मायदेशी पाठवले. या मच्छीमारांना पाकिस्तानच्या जवानांनी काल रात्री उशिरा अटारी-वाघा सीमारेषेवर आणून त्यांना बीएसएफच्या जवानांकडे स्वाधिन केले. याबाबतची माहिती इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायोग कार्यालयाकडून देण्यात आली.
मच्छीमारी करताना समुद्र सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी या मच्छीमारांना पाकिस्तानच्या जवानांनी ताब्यात घेतले होते. भारतात दाखल होताच या मच्छीमारांनी आनंद साजरा केला. अटारी-वाघा सीमारेषेवर डॉक्टरांच्या पथकांनी त्यांची आरोग्य तपासणी देखील केली. त्यावेळी मच्छीमार अनिकेत यांनी सांगितले की, ‘30 महिन्यांपासून मी पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद होते. दोन वर्षांपूर्वी समुद्र सीमेवर मच्छीमार करताना पाकिस्तानी पोलिसांनी अटक केली होती. काही मच्छीमार पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत. माझी विनंती आहे की, त्यांच्या सुटकेसाठी सरकारने प्रयत्न करावेत.`
पाकिस्तानकडून भारतीय मच्छीमारांची सुटका
