इस्लामाबाद – पाकिस्तानने बलुचिस्तान प्रांतात उभारलेल्या ग्वादर विमानतळाचे उद्घाटन चिनचे पंतप्रधान कियांग यांच्या हस्ते होणार आहे,अशी माहिती मंत्री आयातुल्ला तरार यांनी दिली.पाकिस्तामध्ये १५ आणि १६ ऑक्टोबर असे दोन दिवस शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची परिषद होणार आहे. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी कियांग आज पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत.ग्वादर विमानतळ हा चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाचा हिस्सा आहे.या विमानतळाचे उद्घाटन १४ ऑगस्ट रोजी पंतप्रधान शाहबाज शरीफ चिनी अधिकाऱ्यांसमवेत करणार होते.मात्र बलुचिस्तानातील आंदोलनामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला,
पाकच्या ग्वादर विमानतळाचे उद्घाटन चिनी पंतप्रधान करणार
