मुंबई – राममंदिर रोड ते मालाड दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे सर्व चारही मार्गांवर रेल्वे गाड्यांसाठी ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा लागू केली . यामुळे विलंब होत असल्याने आज सोमवारपासून शुक्रवारपर्यंत पश्चिम रेल्वे मार्गावरील १५० ते १७५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत .पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी राम मंदिर रोड ते मालाड दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे महत्वाकांक्षी काम प्रशासनाने हाती घेतले आहे.मालाड रेल्वे स्थानकावर पूर्वेकडे मार्गिका टाकण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ही मार्गिका पश्चिमेकडे टाकण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे. त्यामुळेच रेल्वे गाड्यांवर वेग मर्यादा लागू करावी लागली आहे. त्याच्या परिणामी अनेक लोकल रद्द कराव्या लागल्या . या निर्णयाच्या आज पहिल्याच दिवशी गोरेगाव स्थानकावरून सुटणाऱ्या अनेक जलद गाडया रद्द करण्यात आल्याने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. १७५ फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. शुक्रवार ४ ऑक्टोबरपासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुऱळीत होईल,असे प्रशासनाने सांगितले.
पश्चिम रेल्वे प्रवाशांचे हाल शुक्रवारपर्यंत १७५ लोकल रद्द
