जकार्ता : पश्चिम इंडोनेशियाच्या पश्चिमेकडील रियाउ प्रांताजवळील समुद्रात प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली. यात ११जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण बेपत्ता आहेत. एसबी एव्हलिन कॅलिस्का ०१ ही स्पीड बोट इंद्रागिरी हिलिर जिल्ह्यातील पुलाऊ बुरुंग बंदरातून निघाल्यानंतर समुद्रात बुडाल्याचे प्रांतीय शोध आणि बचाव कार्यालयाचे प्रमुख न्योमन सिद्धकार्य यांनी सांगितले.
पश्चिम इंडोनेशियामध्ये ७८ जणांना घेऊन जाणारी ही स्पीडबोट पलटी झाली असून, यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ९ जण अद्याप बेपत्ता आहेत. आतापर्यंत ५८ जणांना वाचवण्यात यश आले असून, अनेकजण बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती पेकनबारू शोध आणि बचाव संस्थेचे प्रमुख न्योमन सिद्धकार्य यांनी दिली आहे. घटनेनंतर शुक्रवारी सकाळपासूनच समुद्रात बेपत्ता असलेल्या ९ जणांचा शोध सुरु आहे. बोट बुडण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दुसरीकडे मृत आणि बेपत्ता झालेल्यांची संख्या वाढू शकते अशी माहिती देखील समोर आली आहे.
एसबी एव्हलिन कॅलिस्का ०१ मध्ये ७२ प्रवासी होते, बहुतेक लोक कुटुंबांसह ईद-उल-फित्रची सुट्टी साजरी करून घरी परतत होते. या बोटीत आणि ६ क्रू मेंबर्सही होते. रियाझ प्रांतातील इंद्रगिरी हिलिर रिजन्सीमधील टेंबिलहान या शहरातून बंदर सोडल्यानंतर गुरुवारी दुपारी ही बोट बुडाली. याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी जोरदार वादळ धडकल्यामुळे बोट अचानक पलटी झाल्याचे सुरक्षित परतलेल्या प्रवाशांकडून सांगण्यात आले.