पवार गटाच्या सचिन दोडकेंची ५७ कोटी ८३ लाखांची मालमत्ता

पुणे – खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपा, शरद पवार गट आणि मनसेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भाजपाचे भीमराव तापकीर आणि गोल्डन आमदार म्हणून ओळखले गेलेले दिवंगत रमेश बांजळे यांचे पुत्र मनसेचे मयूरेश वांजळे यांच्यापेक्षा शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके हे अधिक श्रीमंत असल्याचे शपथपत्रातून उघड झाले. भीमराव तापकीर यांच्याकडे १४ कोटी ९४ लाख १४ हजार ४०६ रुपये आणि सचिन दोडके यांच्याकडे ५७ कोटी ८३ लाख ४५ हजार ४१८ रुपयांची मालमता आहे. त्यांच्या तुलनेत वांजळे ८४ लाख ६३ हजार ७६३ रुपयांचे धनी आहेत. तापकीर आणि दोडके यांच्या तुलनेत वांजळे हे उच्चशिक्षित आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top