अमरावती (हैदराबाद) – तिरुपती बालाजी मंदिरातील लाडवांमध्ये जनावरांची चरबी असलेले तूप वापरले जात असल्याचा आरोप झाल्याने सरकारचे प्रतिनिधी या नात्याने उप मुख्यमंत्री पवन कल्याण यांनी ११ दिवस व्रत केले. त्यानंतर त्यांनी पायी चालत मंदिरात जाऊन प्रायश्चित्त घेतले. तर त्यांची कन्या पॉलेना अंजना कोनिडेना हिने संस्थानाच्या नियमानुसार मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपली तिरुपती बालाजीवर पूर्ण श्रद्धा आहे असे लिहून दिले.
देवस्थान संस्थानाच्या नियमानुसार बिगर हिंदुंना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर तिरुपती बालाजीवर आपली पूर्ण श्रध्दा आहे,असे लिहून द्यावे लागते.पोलेना ही पवन कल्याण यांची तिसरी पत्नी अॅना लेझनेव्हापासून झालेली मुलगी आहे.