पवना धरणात ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक

पिंपरी –

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाच्या मावळमधील पवना धरणात ३८.५४ टक्के इतका पाणीसाठा आहे. पाणीगळती, पाणीचोरी याकडे पालिका प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष आणि कडक उन्हामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. ३८.५४ टक्के इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध असल्याने पिंपरी-चिंचवडकरांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध भागांना मावळ येथील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधाऱ्यातून पाण्याचा उपसा करून पालिका पाणीपुरवठा विभागाच्या मार्फत संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करते. यावर्षी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तब्बल तीनवेळा धरण शंभर टक्के भरले होते. पाणलोट क्षेत्रात यंदा दोन हजार ७७७ मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर गतवर्षी दोन हजार ७२२ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षीपेक्षा ५५ मिमी पावसाची अधिक नोंद झाली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत पवना धरण तुडुंब भरले होते. मात्र एप्रिल महिन्यात ३८.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

पवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
मावळ तालुक्यातील पवना धरण परीसरात मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या एका युवकाचा पवना धरणात पोहताना धरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पवना धरण परिसरातीत फांगणे गावच्या हद्दीत घडली. लोणा परिसर फिरून झाल्यानंतर हे तरुण पवना धरण परिसर फिरण्यासाठी गेले. पवना धरणाच्या पाण्यात हे तरुण पोहणासाठी उतरते. मात्र या ग्रूपमधील साहिल सावंत याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो धरणात बुडाला. यामध्ये त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top