बीजिंग : चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू सध्या गायब झाले आहे. यापूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री किंग गेंग सार्वजनिक बैठकांमधून दिसेनासे झाले होते. ली शांगफू हे गेल्या दोन आठवड्यापासून कोणत्याही सार्वजनिक बैठकांत दिसलेले नाही. याची चर्चा चीनच नव्हे, तर जगभर सुरू आहे. चीनमधून महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती एकापाठोपाठ गायब होत असल्याने शी जिनपिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळाविषयी गूढ वाढले आहे. ली यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या चर्चा ही सुरू आहेत.
ली शांगफू हे मार्च २०२३ मध्ये चीनचे संरक्षण मंत्री बनले होते. ली यांना शेवटचे बीजिंगमध्ये आयोजित तिसऱ्या तीन आफ्रिका चायना पीस अँड सिक्योरिटी फोरममध्ये पाहिले होते. तिथे त्यांनी भाषण केले होते. त्यानंतर ते गेल्या तीन आठवड्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. व्हिएतनाम दौऱ्यात ते दिसले नव्हते. नंतर सिंगापूरच्या नौसेना अधिकाऱ्यांच्या नियोजित बैठकीतही ते अनुपस्थित होते. ली यांनी प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या आठवड्यात अचानक बैठक रद्द केली असल्याचे व्हिएतनामी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.
परराष्ट्र मंत्र्यानंतर चीनचे संरक्षण मंत्रीदेखील बेपत्ता
