परमबीर सिंग यांची चौकशी करण्याची मागणी याचिका हायकोर्टाने फेटाळली

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अँटिलिया बॉम्ब आणि हिरे व्यापारी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.यावेळी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि कमल खता यांच्या खंडपीठाने नमूद केले की याचिकाकर्त्याने दिलेली माहिती ही केवळ \” ऐकीव पुरावा\” वाटत आहे.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने असेही नमूद केले की,याचिकाकर्त्यांने चौकशीच्या मागणीसाठी सादर केलेले पुरावे कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याचा खुलासा करत नाहीत किंवा माजी पोलिस आयुक्तांच्या हातून दखलपात्र गुन्हा घडण्याची वाजवी शक्यता असल्याचेही दाखवत नाही.जोपर्यंत अशी माहिती रेकॉर्डवर उपलब्ध होत नाही आणि तोपर्यंत त्यांची पोलिसांकडून आणखी तपास करण्याची आवश्यकता आहे असे म्हणत येणार नाही.परशुराम शर्मा यांनी परमवीर सिंग यांच्या विरुद्ध चौकशी करण्यात यावी अशी याचिका दाखल केली आहे. ती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Scroll to Top