लाहोर – पर्यटक किंवा वैद्यकीय विजावर विदेशात जावून तिथे भिक मागणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर आता पाकिस्तान सरकारने कारवाई सुरु केली आहे. सौदी मधून आलेल्या १० जणांना कराची विमानतळावर अटक करण्यात आली . हे सार्वजन सौदीत जावून भिक मागून उपजीविका करायचे . पण त्यामुळे तिथे पाकिस्तानची बदनामी झाली होती सौदी सरकारने पाकिस्तानी भिकाऱ्यांच्या प्रश्नावर अनेक वेळा पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते अखेर परदेशात भिक मागण्यासाठी जाणारे व तिथून आलेल्यांची धरपकड करण्याचा निर्णय पाकिस्तानी सरकारने घेतला . आतापर्यन अशा ७० लोकांना पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे.
फेडरल इन्वेस्टीगेशन एजन्सीने पाकिस्तानात शोध मोहीम हाती घेतली आहे. तसेच सौदी आणि आखातातील अन्य देशातील त्पास्यान्त्र्नांच्या सहकार्याने पाकिस्तानी भिकारी लोकांना स्वदेशात आणि विदेशातही अटक केली जात आहे. रविवारी सौदीतून आलेल्या १० जानना अटक करण्यात आले . चौकशीत हे सर्व तिथे भिक मागून पैसे कमवायचे असे त्यांनी कबुल केले.