पनामा कालव्यावर आता अमेरिकेचे नियंत्रण असणार

वॉशिंग्टन
अमेरिकेने चीनला टॅरिफपाठोपाठ आणखी एक धक्का दिला.पनामा कालव्यावर आता अमेरिकेचे नियंत्रण असणार आहे,अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. चीनचा भाग असलेला देश हॉंगकॉंग येथील कंपनीने पनामा कालव्याच्या २ प्रमुख बंदरांमधील मोठी हिस्सेदारी अमेरिकेतील ब्लॅकरॉक कंपनीला विकली.
ही विक्री २२.८ अब्ज डॉलरला झाली. यामध्ये एकूण २३ देशांमध्ये असलेल्या ४३बंदरांचा समावेश असून यातील २ बंदर हे पनामा कालव्याचे आहेत.मात्र,पनामा सरकारने विक्रीबाबत कोणतीही अधिकृत मंजूरी दिलेली नाही.अमेरिका खंडातून वाहणार पनामा कालवा ८२किमी लांबीचा आहे.हा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडतो.जगभरातील व्यापार आणि नौकावाहनासाठी हा कालवा अत्यंत महत्त्वाचा आहे.दरवर्षी १४ हजार जहाजे या कालव्याद्वारे प्रवास करतात.यामध्ये कार्गो जहाजे, नैसर्गिक वायू वाहतूक करणार्या नौका आणि सैन्य जहाजांचा समावेश आहे. पनामा कालव्याची निर्मिती १९००च्या सुरुवातीला झाला.१९७७ पर्यंत या कालव्यावर अमेरिकेचे नियंत्रण होते. त्यानंतर करारांनुसार हा कालवा पनामा सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला. ३१ डिसेंबर १९९९ रोजी पनामा सरकारने या कालव्याचा पूर्ण ताबा मिळवला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top