पनामा –
मध्य अमेरिकन पनामाच्या कॅरेबियन समुद्रात बुधवारी रात्री जोरदार भूकंप झाला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, पनामा-कोलंबिया सीमेपासून दूर असलेल्या कॅरिबियन समुद्रात बुधवारी रात्री ६.६ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचे केंद्र पनामाच्या पोर्तो ओबाल्डाच्या ईशान्येला सुमारे ४१ किलोमीटर अंतरावर होते. भूकंपाचे केंद्र १० किलोमीटर खोलीवर होते.
मागच्या महिन्यात पनामामध्ये ६.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्यावेळीही जीवितहानी झाली नव्हती. २० मे रोजी न्यू कॅलेडोनियाच्या पूर्वेला प्रशांत महासागरात शनिवारी ७.१ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता.