पनवेल
महापालिका क्षेत्रात १०० एमएलडी पाणी पुरविणारी न्हावा शेवा पाणीपुरवठा योजनेची क्षमता दुपटीपेक्षा जास्त वाढून २२८ एमएलडी होणार आहे. त्यामुळे पनवेलकरांना हक्काचे पाणी मिळणार असून पुढील २० वर्षांचे सुरळीत पाणी पुरवठा नियोजन होणार आहे.
पनवेलकरांचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. पनवेल परिसरात झपाटयाने नागरीकरण होत आहे आणि त्यामुळे विविध सेवांवर त्याचा ताण येत आहे .
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढील २० वर्षांचे पाणी नियोजन होईल अशा तऱ्हेच्या कार्यवाहीची मागणी केली. त्याचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या सर्वांचा फलित म्हणून या प्रकल्पातील सर्व कामे पूर्ण होऊन येत्या वर्षापासून नियमित मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.