पुणे- पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वात पहिला पद्मश्री पुरस्कार मिळालेले डॉ.मनोहर कृष्णाजी डोळे (९७)यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या मागे एक मुलगी, दोन मुले व नातवंडे असा परिवार आहे.डोळे यांचा जन्म १९२८ साली झाला होता. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात मोठे कार्य होते.१९९२ साली त्यांनी निमदारी येथे आदिवासी मुलांसाठी वसतिगृहाची स्थापना केली. गरीब रुग्णांसाठी मोहन ठुसे नेत्र रुग्णालय त्यांनी नारायणगाव येथे १९८२ साली सुरू केले.कबड्डी खेळाचा त्यांना जास्त छंद होता.त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते.