नवी दिल्ली – योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने त्यांच्या कंपनीच्या 14 उत्पादनांची विक्री थांबवली आहे. कंपनीतर्फे आज सर्वोच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली. फ्रँचायझी स्टोअर्सना विक्री थांबलेली उत्पादने कंपनीत पुन्हा पाठवल्याचे पंतजलीतर्फे न्यायालयात सांगितले . न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली . 14 उत्पादनांच्या सर्व जाहिराती मागे घेण्याच्या सूचना माध्यमांनादेखील देण्यात आल्याचे सांगण्यात आले. विक्री थांबवलेल्या उत्पादनांचे परवाने एप्रिलमध्ये उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणातर्फे रद्द करण्यात आले होते. खंडपीठाने पतंजली आयुर्वेदला दोन आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते.….
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |