पणजीत १५ डिसेंबरपासून धावणार विनकंडक्टर बस

पणजी – गोव्यातील कदंब महामंडळाने येत्या १५ डिसेंबरपासून पणजीतील सर्व रस्त्यांवर विनाकंडक्टर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.सुरुवातीला शहरात ३२ इलेक्ट्रिक बसेस प्रायोगिक तत्वावर चालविल्या जातील, अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नाईक तुयेकर यांनी दिली.

पणजी बसस्थानक ते गोवा विद्यापीठ दरम्यान महामंडळाने दोन इलेक्ट्रीक बसेसची सेवा सुरु केली.या बसेसच्या उद्घाटनावेळी नाईक तुयेकर हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की,या विना कंडक्टर बसेसमध्ये प्रवाशांना तिकिटासाठी बसमध्ये क्यूआर कोड उपलब्ध असेल,तसेच पणजी बसस्थानकावरही तशी सोय करण्यात आली आहे. इतकेच नाही तर ज्यांना ऑनलाइन तिकीट काढता येत नसेल त्यांना ड्रायव्हरकडूनही तिकीट घेता येईल.तसेच कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय घाटे यांनी सांगितले की, ही विना कंडक्टर सुविधा व्यवस्थित चालू लागली तर मग या गाड्यांच्या कंडक्टरना तिकीट तपासण्याचे काम दिले जाणार आहे.पणजी नंतर टप्प्याटप्प्याने कदंबच्या सर्व बसेस कंडक्टरविना चालविल्या जातील.कदंब महामंडळाला सध्या २०० बसेस कमी पडत आहेत. त्यामुळे बसेसची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top