पणजी- गोव्यातील राजधानी पणजी शहरात यंदा गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीतर्फे बुधवार २२ मार्च रोजी सकाळी ६ वाजता पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाणार आहे.महालक्ष्मी मंदिरात हा गुढीपाडवा उत्सव साजरा होणार आहे.
तरी या मिरवणुकीत सहभागी होणार्या महिलांनी नऊवारी साडी किंवा सफेद चुडीदार आणि भगव्या रंगाची ओढणी तसेच पुरुषांनी सलवार कुर्ता आणि फेटा असा पेहराव परिधान करावा असे आवाहन समितीचे पदाधिकारी महेश कांदोळकर आणि दत्तप्रसाद भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे. ही मिरवणूक १८ जून रस्त्यावरील औषधविज्ञान कॉलेजपासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत निघणार आहे. मिरवणुकीनंतर मंदिरात पूजा विधी करून गुढी उभारली जाणार आहे. त्यानंतर उपस्थित लोकांना कडुलिंबाचा रस आणि गोड पदार्थाचे वाटप करून या कार्यक्रमाची सांगता होईल.