नवी दिल्ली – मागच्यावर्षी ३० डिसेंबरला झालेल्या भीषण कार अपघातात भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. मुंबईतील रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र ही शस्त्रक्रिया आता केली जाणार नाही.तसेच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऋषभ पंत लवकरच टीम इंडियात पुनरागमनही करु शकतो.
ऋषभ पंतवर दुसरी शस्त्रक्रिया होणार होती. पण आता ही शस्त्रक्रिया होणार नाही.मेडिकल टीम ऋषभ पंतच्या प्रकृती सुधारणेवर नजर ठेऊन आहे.मागच्या ४ महिन्यात ऋषभ पंतच्या प्रकृतीत ज्या पद्धतीने सुधारणा झाली आहे.त्यावर डॉक्टर्सची टीम खूपच खूश आहे.अपघातानंतर ऋषभ पंतच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.त्याचे दुसरे ऑपरेशनसुद्धा होणार होते. पण आता ही शस्त्रक्रिया होणार नाही.ऋषभ पंतच्या प्रकृती सुधारणा प्रक्रियेवर लक्ष ठेऊन असलेल्या मेडीकला टीमला असे वाटत की,त्याच्यावर आता दुसऱ्या ऑपरेशनची गरज नाही. बाकी दुखापत आपोआप बरी होईल. डॉक्टर दर १५ दिवसानंतर एकदा त्याच्या दुखापतीचा आढावा घेतात. ऋषभच्या प्रकृतीतील सुधारणा ही अपेक्षेपेक्षा पण खूप चांगली झाली आहे, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.त्याचे मनोधैर्य यामुळे वाढेल. अशीच वेगाने प्रकृतीत सुधारणा होऊ लागली तर तो वेळेआधी टीम इंडियात पुनरागमन करु शकतो.