प्रयागराज – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्याला जाणार आहेत. यावेळी ते प्रयागराज येथे महाकुंभमध्ये अमृतस्नान करणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात संगम परिसर आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रशासनाने सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा २७ जानेवारी रोजी महाकुंभात सहभागी होणार आहेत. यावेळी ते संगम स्नान, गंगा पूजन आणि अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. याशिवाय राज्यसभेचे उपाध्यक्ष जगदीप धनकर १ फेब्रुवारी रोजी महाकुंभाला भेट देणार आहेत, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १० फेब्रुवारीला महाकुंभाला उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान ५ फेब्रुवारीला महाकुंभमेळ्याला जाणार
