बंदर सेरी बेगावन -पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई आणि सिंगापूर दोन देशांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा म्हणून आज ब्रुनेईला पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी इतिहास रचला. ब्रुनेईला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगावन येथे पोहोचल्यावर राजकुमार हाजी अल-मुहतादी बिल्लाह यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. ब्रुनेईला पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायाच्या लोकांची भेटही घेतली. यावेळी ते एका लहानग्या मुलीशीही बोलले. मुलीने त्यांचे रेखाचित्र मोदींना दिले, त्यावर पंतप्रधानांनी त्यांची सही दिली. उद्या मोदी सिंगापूरला जाणार असून पुढील दोन दिवस ते तिथे असतील. या दौर्यात ते व्यापार आणि गुंतवणुकीचे अनेक करार करणार आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |