श्रीनगर- यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. दिवाळीनिमित्ताने जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथील जोरियमनध्ये भारतीय लष्कराच्या १९१ व्या ब्रिग्रेडसोबत पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच पंतप्रधान बीएसएफ जवानांसोबत देखील दिवाळी साजरी करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे यंदाही सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी कारगीलमध्ये लष्कराच्या जवानांसोबत दीपोत्सव साजरा केला होता. २०२१ मध्ये पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमधील जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. २०२० मध्ये पंतप्रधानांनी राजस्थानच्या जैसलमेर येथील सैनिकांसोबत दिपोत्सव साजरा केला होता. २०१९ मध्ये त्यांनी राजौरीमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. २०१८ साली त्यांनी उत्तराखंडमधील हरसिल गावात भारत-चीन सीमेजवळ लष्कर आणि आयटीबीपी जवानांसोबत दिपोत्सव साजरा केला होता.
पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करणार
