वाशीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला वाशीम दौऱ्यावर येणार होते. पण अचानक त्यांनी हा दौरा रद्द केला असून ते ५ ऑक्टोबरला वाशमला येणार आहेत . यावेळी पोहरादेवीचे दर्शन घेतील अशी माहिती वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यान दिली .आदिवासी समाजाचे दैवत असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी पंतप्रधान मोदी येणार होते. २६ सप्टेंबरला पोहरादेवीच्या नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण करणार होते. पण आता २६ सप्टेंबरऐवजी ५ ऑक्टोंबरला पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्तेनंगारा वस्तूसंग्रहालयाचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
पंतप्रधान मोदींचा वाशीम दौरा ५ ऑक्टोबरला
