नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १६ ते २१ नोव्हेंबर या काळात तीन देशांच्या दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात ते ब्राझीलमधील जी २० देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या वेळी ते विविध देशांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.ब्राझीलच्या रिओ द जिनेरो मध्ये १८ ते २१ नोव्हेंबर या काळात जी २० देशांची परिषद होत आहे. या परिषदेचे यजमानपद ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनाशियो लुला दा सिल्हा भूषवणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जी २० परिषदेत भारत ब्राझील व दक्षिण अफ्रिकेबरोबरच्या तीन देशाच्या महत्त्वाच्या गटात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलच्या दौऱ्यावर
