प्रयागराज – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाकुंभात स्नान करणार आहेत. त्यांच्या या संगम स्नानासाठी सकाळी अकरा ते साडेअकरा हा कालावधी राखीव ठेवण्यात आला असून या काळात संगमावर विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी पंतप्रधान उद्या सकाळी दहा वाजता प्रयागराज विमानतळावर पोहोचणार आहेत. तेथून डीपीएस हेलिपॅडवर जातील व हेलिकॉप्टरने अरेल घाटावर पोहोचणार आहेत. अरेल घाटावरुन पंतप्रधान बोटीने संगमावर स्नानासाठी जाणार आहेत. पंतप्रधानांसाठी अकरा ते साडेअकरा हा अर्धा तास राखीव ठेवण्यात आला असून त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता ते प्रयागराजहून दिल्लीला परत जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाकुंभात स्नान करणार
